Check to restrict your search with:
Menu

Vyāsa-pūjā 2022

Sevāśakti devī dāsī (Vrindavan - India)

माझे परंप्रिय आणि परंपूज्य गुरू महाराज,

तुमच्या चरणी तुमच्या मुलीचे अनंत कोटी कोटी चरण स्पर्श.

गुरू महाराज, तुम्ही प्रभुपदांबद्दल लिहिले की - “यदि प्रभुपाद ना होईतो, तबे की होईतो, ये जीवन बहित किशे”.. त्याच प्रमाणे गुरुदेव तुम्ही माझ्या जीवनात माझ्या आयुष्यात नसते तर माझे जीवन पशू प्रमाणेच होते.

हे पतित पावन गुरू महाराज, जीवनात खूप खूप संकटे आहेत. पण तुमच्या कृपेने, तुमच्या करुणेने, या संकटांना सामोरे जायची शक्ती मिळते. तुमचे ऋण मी कितीही जन्म घेतले तरी चुकवू शकणार नाही.

या भूतलावर माझ्यासाठी तुम्हीच माझे हित-चिंतक, शुभ-चिंतक आहात. माझ्या सर्व आशा तुमच्या चरणी आहेत. माझ्यात शक्ती नाही, बुद्धी नाही, गुरू महाराज. माझ्यावर तुमची करुणा, तुमची दया दृष्टी सदैव राहुद्या.

तुमची शारीरिक स्थिती माझ्या सारख्या शिष्यांमुळे आहे गुरू महाराज. तरी सुद्धा अशा स्थितीत तुम्ही सदैव प्रभुपादांच्या आणि गौरंगाच्या सेवेत असतात. तुम्ही कधीच जाणवू देत नाहीत की तुम्हाला त्रास होतो.

आमच्या साठी, माझ्यासाठी गोलोक धाम सोडून तुम्ही आलात, तुमचे ऋण नाही चुकवू शकत मी. माझ्यात ती शक्ती नाही. मला सदैव तुमच्या सेवेत ठेवा.

उद्या गौर पूर्णिमा आहे - चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्य दिन. मी चैतन्य महाप्रभुंच्या चरणी हीच प्रार्थना करते की माझे आयुष्य माझ्या गुरू महाराजांना दे, आणि त्यांना खूप खूप आयुष्य दे, जेणेकरून माझ्या सारख्या खूप जीवांचा ते उद्धार करू शकतील.

परत तुमच्या श्री चरणी (जे माझे सर्वस्व आहेत) माझे अनंत अनंत कोटी चरण स्पर्श.

तुमची मुलगी,

सेवाशक्ती देवी दासी